Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सभापतींच्या नोटिशीला उद्धव ठाकरे गटाचे उत्तर नाही

सभापतींच्या नोटिशीला उद्धव ठाकरे गटाचे उत्तर नाही
, मंगळवार, 18 जुलै 2023 (08:56 IST)
विधीमंडळाच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील नोटिशीला उत्तर देण्याची मुदत आज संपली. पण अद्याप उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी या नोटिशीला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर ही कारवाई होऊ शकते.
 
सुत्रांच्या माहितीनुसार विधीमंडळाच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील नोटिशीला उत्तर देण्याची मुदत संपली आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांकडून विधीमंडळाच्या नोटीसला उत्तर देण्यात आले आहे. पण ठाकरे गटाच्या सर्व आमदारांकडून या अपात्रतेच्या नोटिशीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
 
उत्तर न दिलेल्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांना विधानसभा अध्यक्ष सुनावणीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर ठाकरे समर्थक आमदारांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती विधीमंडळ सूत्रांनी दिली आहे. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस बजावून लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले होते. तसेच ऐनवेळी म्हणणे मांडण्याची मुभा असल्याचेही म्हटले होते. यात ठाकरे गटाने मुदतीत उत्तर दिलेले नाही. त्यामुळे सभापती नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अलिबाग :बोगस प्रमाणपत्र देऊन रायगड पोलीस दलात आठ वर्ष नोकरी केली ; अखेर गुन्हा दाखल