Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंगावर आंब्याचा वृक्ष कोसळूनही महिलेला मिळाले जीवदान

Webdunia
गुरूवार, 6 जुलै 2023 (07:57 IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेले दोन दिवस आचरा परिसरात तूफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहे. आचरा भंडारवाडी येथील महिलेच्या आचरा बंदर रस्त्यावरून जाताना बागेश्री ओहोळ येथे अंगावर आंब्याचे झाड कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली असून तिच्यावर आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी कुडाळ येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
 
आचरा भंडारवाडी येथील सुनंदा संजय परब या सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांकडे जात असताना मारुती मंदिरनजीक असलेले आंब्याचे झाड तिच्यावर कोसळले. झाड पडल्याच्या दिशेने स्थानिक ग्रामस्थ डॉ. राजेश भोसले, जेरोण फर्नांडीस, मंदार सरजोशी, बाबल्या भिसळे, तसेच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर, अक्षय धेंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली .झाडं मोठे असल्याने आणि विजेच्या तारा यात महिला अडकली असल्याने तिला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. झाडे कट करण्याचा कटर आणून फांद्या कट करत अथक प्रयत्नाने महिलेला बाहेर काढण्यात यश आले. जखमी महिलेला बाबू परुळेकर यांनी कार मध्ये घालून आरोग्य केंद्रात हलवले. परब यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले. रणजित पांगे, मुजफ्फर मुजावर, जयप्रकाश परुळेकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, चिराग आचरेकर, विक्रांत आचरेकर, जितेंद्र जुवेकर यांनी झाड हटविण्यास मदतकार्य केले.
 
आचरा तिठ्यावर काम असल्याने पुन्हा माघारी फिरले असता मोठे झाड रस्तावर पडलेले होते. ती महिलाही दिसत नव्हती म्हणुन त्यांनी कार मधून उतरून मंदार सरजोशी यांच्यासह जवळ जात पहिले असता महिला विव्हळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मदतीसाठी त्यांनी स्थानिकांना संपर्क करत महिलेला वाचवण्यासाठी हालचाली चालू केल्या.
 
आंब्याचा मोठा वृक्ष कोसळताना वीज वाहिन्याही तुटून पडल्या होत्या. त्याच कोसळलेल्या झाडाखाली महिलाही अडकून पडली होती. वीज प्रवाह बंद करण्यासाठी ग्रामस्थ ,वीज वितरण अधिकारी आणि कर्मचारी यांना मोबाईल द्वारे संपर्क करत होते. मात्र ,वीज अधिकारी यांचे फोन बंद येत होते. शेवटी मुझफ्फर मुजावर यांनी कार्यालयाकडे धाव घेत घडलेली घटना सांगत वीज पुरवठा बंद करण्यास सांगितले. या साऱ्या प्रकारामुळे वीजवितरण अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

32 वर्षीय व्यक्ती कडून 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार मुंबईतील घटना

देखण्या नवऱ्यासाठी एका महिलेने केली अनोखी जाहिरात, बघताच हसायला लागाल

पाकिस्तान सांप्रदायिक हिंसाचारामुळे आतापर्यंत 88 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments