Marathi Biodata Maker

शेतकऱ्यांना दिलासा नाही, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा, अजित पवारांची टीका

Webdunia
बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (23:52 IST)
आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला . यावर टीका करताना अजित पवार म्हणाले की राज्य मंत्री मंडळाचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ घालणारा आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जराही दिलासा मिळणार नाही.

राज्य मंत्रिमंडळाने अतिवृष्टीग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसण्याचे आणि त्यांना अधिक गाळात घालण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 3 हेक्टर क्षेत्राची घातलेली मर्यादा अन्यायकारक आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही.ही अट अधिक शिथील करण्याची गरज आहे.

अतिवृष्टीकाळात शेतमजूरांचा रोजगार बुडाल्यानं त्यांनाही मदत केली पाहिजे. घरातील भांडी, कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रतिकुटुंब 3 हजार 800 रुपये एनडीआरएफचा निकष आहे.हा दुप्पट करून भागणार नाही. एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत देऊनही तिथपर्यंत पोहचता येणार नाही. दुकानदार, टपरीधारक यांच्यासाठी एडीआरएफच्या निकषात कोणतीही मदत नाही

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाने अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी घेतलेला निर्णय फसवा, जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारा, अतिवृष्टीग्रस्तांना कसलाही आधार न देणारा आहे. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर दिली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दररोज किती अगरबत्ती लावाव्यात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे जाणून घ्या

आपल्या मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्ये कशी शिकवाल?

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !

मेकअप किट शेअर करू नका, त्वचेच्या या समस्या उद्भवू शकतात

तुमचे बोलणे प्रभावी करा: संवाद कौशल्यातील (Communication Skills) गुप्त गोष्टी जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

निठारी प्रकरणातील दोषी सुरेंद्र कोलीची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली

महाराष्ट्र राज्य प्राणीसंग्रहालय प्राधिकरण" स्थापन करण्यास राज्य सरकारची मान्यता

कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या दोन हल्ल्यांमध्ये एका महिलेचा मृत्यू

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची तयारी, बावनकुळे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे मुंबईत निधन

पुढील लेख
Show comments