Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ते महाराष्ट्राच्या राजकारणातून जवळपास गायब झाले आहेत

Webdunia
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 (08:37 IST)
शिवसेना नाव आणि पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गट आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. यातच आता मिस्टर इंडिया चित्रपटातील डायलॉग वापरुन भाजपने "मिस्टर इंडिया गायब झाला" म्हटले आहे.
 
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे खलनायक वर्णन करत ‘मोगॅम्बो खुश झाला’ असे म्हटले होते. त्यावर आता भाजपने उद्धव यांना त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईतील भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव यांच्यावर प्रत्युत्तर देताना म्हटले की, ते स्वतः मिस्टर इंडिया बनत आहेत. ते महाराष्ट्राच्या राजकारणातून जवळपास गायब झाले आहेत. उद्धव ठाकरे भाजप नेतृत्वाला मोगॅम्बो म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांना गोष्टी समजत नाहीत, तेच असे मूर्खासारखे भाष्य करतात, अशी टीका त्यांनी केली. 
 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

सरकारने बेकायदेशीर बांगलादेशींना परत पाठवावे, मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

बीड मध्ये मुलीचा एचआयव्ही संसर्गाने मृत्यू झाल्याची अफवा पसरली, गावाने कुटुंबावर टाकला बहिष्कार

LIVE: सरकारने बेकायदेशीर बांगलादेशींना परत पाठवावे- मिलिंद देवरा

हेल्मेट आणि लायसन्सशिवाय दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दिली अनोखी शिक्षा

महापालिका निवडणुक एमव्हीए वर की स्वबळावर? उद्धव ठाकरे गटाची रणनीती 23 जानेवारी रोजी होणार निश्चित

पुढील लेख
Show comments