Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 6 April 2025
webdunia

आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार :फडणवीस

devendra fadnavis
, शुक्रवार, 26 मार्च 2021 (16:47 IST)
भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळास भेट दिल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना, राज्य सरकारवर टीका केली व घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.
 
फडणवीस म्हणाले, “जी घटना घडली आहे त्यामध्ये सरकारचा बीएमसीचं अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा हा स्पष्टपणे या ठिकाणी दिसतो आहे. या संदर्भात आता काही फार बोलणं योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. पण मला हे समजत नाही की आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे. मला असं वाटतं या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना घडणार नाही, यासाठी घोषणा नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही ही सरकारच्यावतीने झाली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई : NCB ने ड्रग पेडलर शादाब बटाटा याला अटक केली