राज्यातील साखर कारखानदारी अतिशय कठीण परिस्थितीतून मार्ग काढत आहे. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन वाढले पण बाजारात साखरेस मागणी नाही.अगस्ती साखर कारखान्याने प्रतिटन ५०० ते ६०० रुपये आर्थिक नुकसान सहन करून एफआरपीनुसार जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर दिले.
जिल्हा सहकारी बँकेने वेळोवेळी सहकार्य केल्यानेच अगस्तीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक ऊसदर दिले आहेत. सर्वांच्याच योगदानामुळे हे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन अगस्तीचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी केले.अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा २८ वा गळीत हंगामाचा बॅायलर अग्निप्रदिपन समारंभ रविवारी पार पडला. यावेळी गायकर बोलत होते.