Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजाची मूर्ती 22 फुटांऐवजी तीन फुटांची

Webdunia
बुधवार, 24 जून 2020 (08:51 IST)
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश गल्ली सार्वजनिक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. “मुंबईचा राजा“अशी ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या गणपतीची मूर्ती यंदा 22 फुटांऐवजी तीन फुटांची बसवून उत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.उंच मूर्ती आणि आकर्षक देखाव्यासाठी गणेश गल्ली मंडळ प्रसिध्द आहे. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे मंडळाने मूर्तीची उंची कमी करून साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. यावर्षी लहान मूर्ती आणून उत्सवाची उंची वाढविणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. तसेच गणपती बाप्पाचे दर्शन सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि इतरांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करणार असल्याची माहिती स्वप्नील परब यांनी दिली.
 
तसेच लालबाग भागातील प्रसिध्द चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा आगमन सोहळा रद्द केला आहे. या मंडळाने मंडपातच गणेशमूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे,. परळचा राजा म्हणजे नरेपार्कच्या गणपतीची मूर्तीही 23 फुटांऐवजी 3 फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.  विसर्जन मिरवणूक न करता कृत्रिम तलावात विसर्जन केले जाईल. या मंडळाने वर्गणीही  गोळा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर खेतवाडीतल्या 31 गणेशोत्सव मंडळांनी दोन ते पाच फुटापर्यंतच्या मूर्ती घडवून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
वडाळा येथील जीएसबी गणेशोत्सव मंडळ भाद्रपदऐवजी फेब्रवारी 2021 मध्ये माघी गणेशोत्सव साजरा करणार आहे. मुंबईत 12 हजार सार्वजनिक गणेश मंडळे असून 2 लाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु यंदा कोरोनाचे संकट ओढवले असून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे गरजेचे आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे व गणेश मुर्ती लहान बसविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. सार्वजनिक गणेश मंडळांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला असून उपनगरातील 99 टक्के मंडळानी लहान गणेश मुर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तर गणेश गल्लीसह डोंगरीचा राजा म्हणून ओळख असलेल्या गणेश मंडळानेही लहान गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे  

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments