rashifal-2026

एकाच दिवशी तिघांची आत्महत्या

Webdunia
गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (18:40 IST)
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी तिघांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपविण्याची धक्कादायक घटना घडली आहे. नैराश्यातून त्यांनी गळफास लावून हे टोकाचे पाऊल घेतल्याचे समजले आहे. मृतांमध्ये एका शिक्षकाचा समावेश आहे. ते धारूरच्या गावंदरा गावातील रहिवासी होते. सुरेश रामकिसन बडे(37)असे या मयत शिक्षकाचे नाव आहे. सुरेश यांनी पहाटे 3 वाजेच्या सुमारास माजलगावच्या जवळ असलेल्या केसापुरी कॅम्प येथे लोखंडी आडूला गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले. तर माजलगाव तालुक्यात कृष्णा बाळासाहेब कोको या 19 वर्षीय तरुणाने कमरेच्या बेल्टचा गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. तर माजलगावातील राजेगाव येथे रामचंद्र धुराजी गरड या 40 वर्षीय व्यक्तीने आर्थिक जाचाला कंटाळून शेतातील असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले.  एकाच दिवशी तिघांच्या मृत्यूने सर्व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

गुगल मॅप्सशिवाय प्रवासात मदत करणारे हे ५ ॲप्स तुमच्या फोनमध्ये आजच डाऊनलोड करा

अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची ममता बॅनर्जी यांची मागणी

दिल्ली द्वारका कोर्टाला बॉम्बची धमकी मिळाली, हाय अलर्ट जारी

उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रे डागली, दक्षिण कोरिया सतर्क; सुरक्षेच्या चिंता वाढल्या

आर्यना सबैलेन्काने जोविचला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला

पुढील लेख
Show comments