suvichar

पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

Webdunia
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (14:40 IST)
औरंगाबाद- जिल्ह्यातील भांगसीमाता गड परिसरात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी घडली ज्यात दोघांचा मृत्यू झाला. तर एकाचा वेरुळ परिसरात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
 
औरंगाबाद येथील भांगसीमाता गड परिसरात घडलेल्या घटनेतील दोघां तरुणांना रस्त्यात लागलेल्या वाहत्या पाण्यात पोहण्याचा मोह झाला. परंतु पाण्याच्या प्रवाहाला वेग जास्त असल्याने या दोघांचाही मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत गारखेड्यातील तरुण मित्रांसोबत वेरूळच्या लेणी परिसरात गेला असताना तेथील कुंडात बुडून त्याचा मृत्यू झाला.
 
नेमकं काय घडलं ? 
वाळूज औद्योगिक परिसरातील खासगी कंपनीत काम करणारे प्रल्हाद राम चव्हाण, शेजारील बाळू अप्पा पालवे, त्यांचा तीन वर्षाचा मुलगा व पालवे यांच्या मेहुणा नितीन रमेश गुंडाळे हे रविवारी भांगसीमाता गडावर गेले होते. गडावर दर्शन घेऊन ते दुपारी चार वाजता गडावरून खाली उतरले. गडाच्या पायथ्याशी असलेल्या शेतातील झाडाखाली बसून त्यांनी घरुन आणलेल्या डब्यातून जेवण केले. पाच वाजेच्या सुमारास घराकडे निघाले असता वाटेत वंजारवाडी शिवारात मोठ्या प्रमाणावर साचलेले पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. प्रल्हाद व नितीनला पोहू लागले तर सोबत तीन वर्षांचा मुलगा असल्याने बाळू यांनी काठावरच थांबण्याचा निर्णय घेतला. प्रल्हाद व नितीन वाहत्या पाण्यात बुडू लागले हे बघून बाळूने आरडाओरड सुरू केली परंतु तोपर्यंत दोघेही बुडाले.
 
दीड तासाने दोघांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
तर दुसर्‍या घटनेत वेरूळ लेणीतील येळगंगा नदीवरील जोगेश्वरी मंदिरासमोरील कुंडात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. आर्यन विजयप्रताप सहानी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गारखेड्यातील बाळकृष्णनगरात राहत होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

अजित पवार विमान अपघात: बारामती दुर्घटनेनंतर डीजीसीएची मोठी कारवाई, व्हीएसआर व्हेंचर्सच्या 4 विमानांवर बंदी

डिजिटल अरेस्टकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

Marathi Bhasha Gaurav Din 2026 Wishes मराठी भाषा गौरव दिन शुभेच्छा

LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नागपूर दौऱ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था

तुर्कीयेमध्ये टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच एक F-16 लढाऊ विमान कोसळले, पायलटच्या मृत्यू

पुढील लेख
Show comments