Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीषण अपघातात पंढरपुरातील तिघांचा जागीच मृत्यू

भीषण अपघातात पंढरपुरातील तिघांचा जागीच मृत्यू
, शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (15:04 IST)
पंढरपूर :: सोलापूर येथुन पंढरपूरकडे येणाऱ्या कारला खासगी बसणे दिलेल्या धडकेत पंढरपूर येथील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान पेनुर ता.मोहोळ (जुदगारपाटी) येथे घडली आहे.
अपघातामध्ये चक्काचुर झालेली कार.
याबाबत अधिक माहिती अशी की, तानाजी चौक, पंढरपूर येथील सुरज कदम (वय- 28), प्रशांत शेटे (वय-40), ऋषिकेश साखरे (वय 35) हे तीन युवक सोलापूर येथून कारने पंढरपूरकडे येत होते. पेनुर ता. मोहोळ येथील जुदगारपाटी येथील वळणावरती खाजगी बस व कारची जोराची धडक दिली. त्यामध्ये कारमधील तिन्ही युवक जागीच ठार झाले. खासगी बसचे तसेच कारचेही नुकसान झाले असून, ड्रायव्हरच्या पायाला दुखापत झाली आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची बुद्धी भ्रष्ट केलीयं-चंद्रशेखर बावनकुळे