Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

218 कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करून इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेण्यासंदर्भात तीन व्यक्तींना अटक

arrest
, मंगळवार, 3 मे 2022 (08:06 IST)
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने जवळपास 218 कोटींच्या बनावट खरेदी बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेऊन शासनाची रु.39 कोटी कर महसूलाची हानी करणाऱ्या तीन व्यक्तींना अटक केली आहे.
 
मे. एम्पायर एंटरप्राईजेस, मे. शंकर एंटरप्राईजेस व मे. एम. एम. एंटरप्राईजेस या व्यापाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरीविरोधी विशेष कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहीमेअंतर्गत शंकर आप्पा जाधव, बापू वसंत वाघमारे व आदेश मधुकर गायकवाड यांना दि. 28 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली आहे.
 
महानगर दंडाधिकाऱ्यांनी या तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या धडक कारवाईमुळे राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-अ, मुंबई, राहुल द्विवेदी (भा.प्र.से.) व राज्यकर उपआयुक्त संजय वि. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त राहुल मोहोकर व गिरीश पाटील यांनी  राबवली.
 
सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आतापर्यंत आठ अटक कारवाया करण्यात आल्या आहेत, व याद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांस एक प्रकारे इशारा दिलेला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा एकमताने निर्णय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे