rashifal-2026

अवनीचे बछडे दिसले, वनविभागाची माहिती

Webdunia
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (08:38 IST)
पूर्ण देशात अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी संताप व्यक्त होतो आहे. यातच तिचे लहान बछडे जिवंत आहेत की नाही यावरून सरकारवर जोरदार टीका सुरु आहे. मात्र आता थोडी दिलासा देणारी बातमी आहे. नरभक्षक टी-१ वाघिणीला ठार मारल्यानंतर तिच्या अनाथ झालेल्या दोन बछड्यांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने युद्धस्तरावर शोधमोहिम सुरू केली आहे.  गुरुवारी पेट्रोलिंग करणाऱ्या वन विभागाच्या पथकाने यवतमाळमधील विहिरगावजवळ टी-१ वाघिणीचे बछडे रस्ता ओलांडताना दिसल्याचा दावा केला आहे.पांढरकवड्यातील या वाघिणीला वनखात्याने टी-१ हे नाव दिले होते. मात्र, या परिसरातील ही वाघीण ‘अवनी’याच नावाने ओळखली जात होती.बछड्यांचा शोध घेण्यासाठी सराटी, बोराटी, वरूड, भुलगड आदी भागातील जंगल परिसर पिंजून काढत आहे. टी-१ वाघिणीसोबत राहणारा नर वाघसुद्धा याच परिसरात आहे. या बछड्यांना तातडीने बेशुद्ध करून जेरबंद करणे आवश्यक आहे. या बछड्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आता वनविभागासमोर आहे. त्यामुळे जोपर्यंत नागरिकांना आणि प्राणी मित्रांना हे दोघे दिसत नाही तो पर्यंत सरकारवर टीका सुरूच राहणार आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 100 जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली, 30 डिसेंबर रोजी निर्णय होणार

लातूरमध्ये तरुणाची पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या

LIVE: अजित पवार आणि शरद पवार युती फिस्कटली

शिंदेसेनेच्या नेत्याची निर्घृण हत्या

फिल्डिंग करताना मुंबईचा खेळाडू कोसळला

पुढील लेख
Show comments