Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक परिमंडलात मार्चमध्ये १२ हजार ३६० थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत; ७७८ कोटी रुपये थकबाकी

Webdunia
शुक्रवार, 25 मार्च 2022 (21:23 IST)
महावितरणच्या नाशिक परिमंडलातील घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे व ईतर वर्गवारीच्या ६ लाख १८ हजार ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ७७८ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असुन, महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम या मार्च महिन्यात सुरु आहे. या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे नाशिक परिमंडलात मार्च २२ या महिन्यात १२ हजार ३६० थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे सदर ग्राहकांना पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करून घ्यायचा असेल तर त्यांना नियमानुसार एकूण थकबाकीसह पुनर्रजोडणी शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
महावितरणच्या नाशिक मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण २ लाख ३३ हजार १३९ ग्राहकांकडे २२ कोटी १५ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील २६ हजार २५१ ग्राहंकांकडे ८ कोटी ६३ लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील ५ हजार ११० ग्राहकांकडे ९ कोटी ८७ लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील २ हजार ६९८ ग्राहकांकडे १३९ कोटी, पाणीपुरवठा योजनेतील १ हजार १७ ग्राहकांकडे २३ कोटी २१ लाख, सार्वजनिक सेवा योजनेतील १ हजार ८३० ग्राहकांकडे २ कोटी १० लाख, इतर वर्गवारीतील १ हजार ५३ ग्राहकांकडे ७० लाख असे एकूण नाशिक मंडळातील या सर्व वर्गवारीतील २ लाख ७१ हजार ९८ ग्राहकांकडे २०५ कोटी ६५ लाख रुपये थकबाकी आहे.
 
मालेगाव मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण ६६ हजार २७४ ग्राहकांकडे ५ कोटी १७ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील ४ हजार ६६६ ग्राहंकांकडे १ कोटी ३० लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील १ हजार ६९४ ग्राहकांकडे १ कोटी १० लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील १ हजार ३४६ ग्राहकांकडे ८८ कोटी ७६ लाख, पाणीपुरवठा योजना ६६१ ग्राहकांकडे १७ कोटी ४६ लाख, सार्वजनिक सेवा योजनेतील ९१२ ग्राहकांकडे ८४ लाख, इतर वर्गवारीतील ६६२ ग्राहकांकडे १० लाख असे एकूण मालेगाव मंडळातील सर्व वर्गवारीतील ७६ हजार १७५ ग्राहकांकडे ११४ कोटी ७२ लाख रुपये थकबाकी आहे. तर अहमदनगर मंडळात वरील सर्व वर्गवारीतील २ लाख ७० हजार ८०३ ग्राहकांकडे ४५८ कोटी २ लाख रुपये थकबाकी आहे अशी एकूण नाशिक परीमंडलात एकूण ६ लाख १८ हजार ७६ ग्राहकांकडे ७७८ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी आहे.
 
दरमहा सातत्याने पाठपुरावा करून ग्राहकांना नित्यनेमाने संपर्क करून सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे. फेब्रुवारी महिन्यात सुद्धा नाशिक आणि मालेगाव मंडळात ८ हजार ९४३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली होती. ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहका़नी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडी़ग वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसूली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मागील महिन्याप्रमाणे फेब्रुवारी व मार्च महिन्यात सुद्धा सदर मोहीम राबविली जात आहे. यासोबतच थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत देयकांचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वा ईमेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्या जाणार आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सदर ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व ग्राहक वर्गवारीनुसार पुनर्रजोडणी शुल्क (जीएसटीसह) भरल्यानंतर भौगोलिक भागानुसार साधारणतः पुढील २४ तास अवधीपर्यंत त्या ग्राहकांचा वीज पुरवठा पुर्ववत जोडणी करण्यास लागू शकतो. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 11 वाजता राजभवनात पोहोचणार

LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार राजीनामा

मेहकरमध्ये दोन गटात हाणामारी, 23 जणांवर गुन्हा दाखल

नागपुरात नव्या सरकारच्या स्वागताची तयारी सुरू, उपराजधानी हिवाळी अधिवेशनासाठी सज्ज झाली

नागपूर मध्ये एका व्यक्तीने एका वृद्ध महिलेवर केला हल्ला

पुढील लेख
Show comments