Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाऊजीची आणि मेहुण्याची आत्महत्या! परिसरात खळबळ…

suicide
, शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (20:29 IST)
छत्रपती संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भाऊजीने आणि मेहुण्याने एकाच दिवशी वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या केली आहे. कर्जाला कंटाळून मेहुण्याने गळफास घेतला आहे तर मूलबाळ होत नसल्याच्या नैराशातून भाऊजीने विष प्राशन केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त होत आहे. राजू लिंबाजी गायकवाड (वय ३२) आणि विनोद शालिक बनसोड (वय ३०) अशी आत्महत्या करणाऱ्या भाऊजी व मेहुण्याचे नाव आहे.
 
ही घटना आज (१९ ऑगस्ट) रोजी घडली आहे. राजू गायकवाड हे मूळचे टाकळी अंतुर, ता. कन्नडचे होते तर विनोद बनसोड हे मूळचे हट्टी, तालुका सिल्लोड येथे राहत होते. या व्यक्तींनी एकाच दिवशी आत्महत्या केल्यामुळे कुटुंबियांच्या शोककळा पसरली आहे.
 
राजू याचा अकरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पण लग्नाला ११ वर्षे उलटूनही मुलबाळ होत नसल्याने ते सतत तणावात व नैराश्यात राहायचे. आई, वडील व दोन्ही भावातून विभक्त राहत होते. राजू यांची पत्नी चार-पाच दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. राजू हे घरी एकटेच होते. शुक्रवारी सकाळी राजू यांनी शेतातील राहत्या घरात विष प्राशन केले आहे. राजू यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास गावातीलच स्वतःच्या गॅरेजमध्ये विनोद यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शेतात काहीच पिकत नसल्याने त्यांनी स्वतःचा गॅरेज टाकला होता. पण, मागील काही दिवसांपासून त्यांची आर्थिक परीस्थिती बेताचे होती. त्यात बँकेतून कर्ज घेऊन पेरणी केली. पण पावसाने पाठ फिरवल्याने शेतातून काही हाती येण्याची अपेक्षा कमी झाली होती. डोळ्यासमोर नापिकी दिसून येत असल्याने बँकेच्या कर्जासह इतर खासगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कैद्यांना मिळणार पगारवाढ..!