Marathi Biodata Maker

डीजेच्या दणदणाटाने दोघांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (21:26 IST)
Two died due to DJ's noise : सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला. दोन तरुणांच्या या मृत्यूला गणेश विसर्जन मिरवणुकीमधील डीजेचा दणदणाटही कारणीभूत ठरला. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील शेखर पावशे (वय ३२, रा. कवठेएकंद) आणि वाळवा तालुक्यातील दुधारीमधील प्रवीण शिरतोडे (वय ३५, रा. दुधारी) या तरुणांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी हे दोघे गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला. यामधील शेखर पावशेची १० दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती.
 
दुधारी येथील प्रवीण शिरतोडेचा सेंट्रिंग व्यवसाय आहे. सोमवारी रात्री सात वाजता तो कामावरून घरी येत होता. घरी परतत असताना रस्त्यात त्याची दुचाकी बंद पडली. बरेच अंतर दुचाकी ढकलत तो घरी पोहोचला. परिसरातील मंडळाची मिरवणूक असल्याने डबा व गाडी घरी ठेवून तो लगेचच मिरवणुकीत सामील झाला. दुचाकी ढकलून दमलेल्या प्रवीणला काही वेळातच डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू लागले. मित्रांसोबत नाचत असतानाच त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
कवठेएकंदमधील शेखर या तरुणाचे सोमवारी रात्री निधन झाले. मिरवणुकीतील डीजेचा तीव्र आवाज सहन न झाल्याने हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघ्या १० दिवसांपूर्वीच त्याच्या हृदयाची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. ऐन उत्सवाच्या वातावरणात उमद्या शेखरचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 16 ठार

अमेरिकेतील लुइझियानामध्ये भीषण गोळीबार, ८ मुलांचा दुःखद मृत्यू

LIVE: नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

दहावी-बारावी निकाल २०२६: निकालाची तारीख जाहीर? शिक्षण मंडळाकडून मोठी अपडेट समोर

इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, उत्तर कोरियाने सलग दुसऱ्या दिवशी क्लस्टर बॉम्ब क्षेपणास्त्रे डागली

पुढील लेख
Show comments