Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट, जयंत पाटील म्हणाले...

Jayant Patil
, गुरूवार, 4 मे 2023 (07:58 IST)
तसेच शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलं आहे. जोपर्यंत शरद पवार राजीनामा मागे घेत नाहीत, तोपर्यंत उपोषण करू, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
 
दरम्यान, अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यात कोणतेही गट पडले नाहीत, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून दोन गट पडल्याची चर्चा आहे, याबाबत विचारल असता जयंत पाटील म्हणाले, “तुम्ही आमच्यात गट पाडू नका, आमच्यात दोन गट नाहीयेत.”
 
राष्ट्रवादीतील अस्थिरतेवर भाष्य करताना जयंत पाटील पुढे म्हणाले, “शरद पवारांनी राजीनामा देणं, हे कार्यकर्त्यांना योग्य वाटलं नाही. त्यामुळे शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, असं सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे. आज सकाळपासून मी मुंबईत नाही. मला अनेक आमदार, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्षांनी फोन करून सांगितलं की, पवारसाहेबांनी राजीनामा देणं योग्य नाही, अशी त्यांनी भूमिका मांडली आहे.”
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ३४ नागरिक भारतात दाखल