Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत

Webdunia
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (07:47 IST)
जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन त्यात १५ मजूर मृत्यूमुखी पडले. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
 
मृत मजूर हे रावेर तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे. मृतांमध्ये सहा महिला व नऊ पुरूष आहेत. हा अपघात दुर्देवी असल्याचे सांगताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मृत मजुरांच्या कुटुंबियाप्रती आपली सहवेदना व्यक्त केली आहे. याशिवाय अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री योगींनी लखनौमध्ये आपत्कालीन बैठक बोलावली, प्रयागराजला येणाऱ्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या

महाकुंभातील चेंगराचेंगरीत शेकडो लोक बेपत्ता

महाकुंभातील संगम येथे चेंगराचेंगरी

एआय वापरा पण त्याचे गुलाम बनू नका - मुकेश अंबानी

गुइलेन-बॅरे सिंड्रोम, गूढ आजाराने पश्चिम बंगालमध्ये किशोरचा मृत्यू

पुढील लेख
Show comments