Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किवळे येथे दोन दुचाकींचा अपघात; तीन मजूर ठार, दोघे जखमी

Webdunia
गुरूवार, 3 जून 2021 (07:41 IST)
दोन दुचाकींच्या अपघातानंतर एक दुचाकी 50 ते 60  फूट पुढे फरफटत जाऊन दगडावर आदळली. या दुर्घटनेत दुचाकीवरून ट्रिपलसीट निघालेल्या तिघा मजुरांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले.  पुण्याजवळील कात्रज -देहूरोड बाह्यवळण महामार्गावर किवळे-विकासनगरजवळ हा अपघात घडला.
 
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिल दादाराव करे (वय 22), मंगेश शंकर कुंडगीर (वय 17 ), महादू लक्ष्मण केजगीकर (वय 29 , तिघे रा. डोंगरपिंपळा,ता गंगाखेड, जिल्हा परभणी) अशी मृत मजुरांची नावे आहेत. जखमींमध्ये मल्लया इरय्या स्वामी, शंकरय्या मलकय्या स्वामी यांचा समावेश आहे.
 
मृत मजूर हे परभणी जिल्ह्यातील होते. कामाच्या शोधात ते लोणावळा येथे गेले होते. हे तिघेजण एकाच दुचाकीवर  पुन्हा आपल्या घराकडे जात होते. त्यांच्या दुचाकीची पुढे जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीच्या सायलेन्सरला धडक बसली. यात दुचाकीसह फरफटत पुढे जाऊन दगडावर दुचाकी आदळली. यात तिघेही गंभीर जखमी झाले होते. जखमींना त्वरित देहूरोड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

Accident: जगद्गुरू कृपालूजी महाराजांच्या मुलीचा अपघाती मृत्यु

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांवर सस्पेन्स कायम, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला

पुढील लेख
Show comments