Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली

Webdunia
शनिवार, 13 जानेवारी 2024 (17:38 IST)
सध्या राज्यात मराठा आरक्षणासाठी  मनोक जरांगे पाटील हे आंदोलन करत आहे. येत्या 20 जानेवारीपासून ते मुंबईला येणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणी साठी आत्ता पर्यंत अनेकांनी आत्महत्या केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना कोणतेही टोकाचे पाऊल न घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी देखील आत्महत्या करू नये असे देखील म्हटले आहे.

गेल्या दोन दिवसांत मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन दोन तरुणांनी टोकाची भूमिका घेत आत्महत्या केली आहे. प्रदीप मते आणि सचिन शिंदे असे या मयत तरुणांची नावे आहेत. हे दोघे परभणी आणि लातूर जिल्याचे होते. परभणीतील सनपुरी गावातील सचिन शिंदे (34) याने मी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे असे चिट्टीत लिहून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर 
 
लातूर जिल्ह्यात आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसचे शिक्षण घेणाऱ्या प्रदीप मते (21) ने मराठा आरक्षण असे लिहून चिट्ठी मोबाईल स्टेटसला लावून खाजगी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असून मृतदेह ताब्यात घेतले आहे.  
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी महंत यती नरसिंहानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला

मंगळुरूमधील कोल्लूर पुलाजवळ व्यावसायिकाची कार सापडली, पोलिसांचा शोध सुरु

डासना मंदिरात सुरक्षा वाढवली, कैला भट्ट चौकात पोलीस तैनात

रामलीलात अभिनय करताना रंगमंचावर हृदयविकाराचा झटका येऊन कलाकाराचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मुंबई मेट्रोची स्वारी प्रवाशांशी बोलले

पुढील लेख
Show comments