Dharma Sangrah

साताऱ्याचं नाव दिसलंच नाही; उदयनराजे वेटींगवरच

Webdunia
गुरूवार, 28 मार्च 2024 (08:48 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची माहिती दिली आहे. २८ मार्च रोजी आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जागावाटप आणि उमेदवारी जाहीर करू, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, उदयनराजेंचं नाव आजच्या यादीत जरी नसलं तरी उद्याच्या यादीत येऊ शकतं. मात्र, सर्वकाही पत्ते उद्याच उलगडले जाणार आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीकडेच आहे. त्यामुळे, साहजिकच येथील लोकसभा उमेदवार घड्याळाच्याच चिन्हावर निवडणुकीसाठी द्यावा, अशी कार्यकर्त्यांनी भावना असल्याचं संजीव नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे, सातारा जागा कोणाला मिळणार, हे उद्याच जाहीर होईल, असेच चित्र आहे.
 
साताऱ्यात आल्यावर उदयनराजे म्हणाले
"लोकांचं अलोट प्रेम पाहून मन भारावून गेलं. मी आयुष्यात राजकारण कधी केलं नाही. लोकांना केंद्रबिंदू मानून मी समाजकारण केलं. त्याचीच पोचपावती म्हणून आज लोक एवढ्या संख्येने उपस्थित आहेत. हे सगळं बघून काय बोलावं, हे मला सुधरत नाही. कालही मी जनतेसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.  उमेदवार यादी आज जाहीर होईल. तो एक प्रक्रियेचा भाग आहे. पण सगळं निश्चित झालं आहे. मी निवडणूक लढणारच आहे," असा दावा त्यांनी केला आहे.
 
Edited by Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील गैर-कृषी विद्यापीठांमध्ये १४ मे पासून आंदोलन

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारला नाशिकमधून अटक

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये स्फोट; आत्मघाती हल्ल्यात ९ जण ठार

GT vs SRH: हैदराबादचा संघ ८६ धावांवर सर्वबाद, गुजरातने दणदणीत विजयासह अव्वल स्थान पटकावले

नायजेरियन सैन्याच्या बॉम्बहल्ल्यात मुलांसह सुमारे १०० नागरिक ठार

पुढील लेख
Show comments