suvichar

उध्दव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येऊ शकतात- संजय राऊत

Webdunia
बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (08:05 IST)
मुंबईत शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम सुरु आहे. या स्मारकात बाळासाहेबांच्या अनेक आठवणींच जतन केलं जाणार आहे. या स्मारकासंदर्भात राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ते दोघे भाऊ आहेत.ते कधीही एकत्र येऊ शकतात. यात तिसऱ्याने भाग घेऊ नये. मी दोघांनाही ओळखतो. दोघांशी माझ तितकचं जिव्हाळ्याच नातं आहे.पण राजकीय विषय येतो, तेव्हा मी मनापासून माझे पूर्ण कुटूंब आणि सहकारी कायम बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचेही ते म्हणाले.
 
राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे दोघे ठाकरे कुटुंबाचे वारसदार. दोन्हीच्या सेना वेगवेगळ्या. 2006 साली दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या.तेव्हापासून हे दोघे एकत्र येणार का?असा प्रश्न राजकीय पटलावर काय़मचा बनला. निवडणुकीच्यावेळी एकत्र येण्याच्या चर्चा होवू लागल्या. कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली.मात्र एकी झाली नाही. परंतु दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मारकाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येतील अशी आशा सर्वांना आहे.


Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

यवतमाळमध्ये पैशाच्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे चाकूने वार करून हत्या

GT vs CSK: शुभमन गिलने टी-२० मध्ये ६००० धावा आणि २०० षटकार पूर्ण केले

FIFA World Cup: फुटबॉल विश्वचषकासाठी इजिप्तचा २७ खेळाडूंचा प्राथमिक संघ जाहीर

LIVE: एल निनोच्या धोक्यामुळे राज्य सरकार सतर्क

एल निनोच्या धोक्यामुळे राज्य सरकार सतर्क, ३० जूनपूर्वी कर्जमाफी लागू होणार

पुढील लेख
Show comments