Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'आईला गिळायला निघालेली ही अवलाद' उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

Webdunia
मंगळवार, 26 जुलै 2022 (09:30 IST)
"मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असतं, तर त्यांनी आणखी काय वेगळं केलं असतं? कारण यांची भूक भागत नाहीये. यांना मुख्यमंत्रिपद पण हवंय आणि आता यांना शिवसेनाप्रमुख व्हायचंय. शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलेत हे आता. राजकारणात ज्या आईने जन्म दिला, त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे," ही राक्षसी महत्वकांक्षा आहे आणि याला हावरटपणा म्हणतात... तुझं तेही माझं... माझं तेही माझं... ह्याचं तेही माझं... आणि त्याचं तेही माझं.. अशी सगळी ही वृत्ती आहे.. हावरटपणाला सीमा नसते," ज्यावेळी शिवसेनेने यांना आधार दिला, त्यावेळी ही सगळी साधी लोकं होती, त्यांना सगळं काही देऊन माझी चूक झाली. त्यांना ताकद दिली, त्यांनी त्या ताकदीने फक्त माझ्यावर फक्त पलटवारच नाही केला तर राजकारणामध्ये ज्या आईने त्यांना जन्म दिला त्या आईलाच गिळायला निघालेली ही अवलाद आहे. मी ज्यावेळी  रुग्णालयात होतो त्यावेळी काही जणांनी बाहेर हालचाली सुरु केल्या होत्या, काही जणांनी माझी प्रकृती सुधारणार नाही यासाठी देव पाण्यात ठेवले होते. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी प्रमुख संजय राऊत यांना मुलाखत दिली, त्यात त्यांनी असं म्हटलं. 
 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments