Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरे यांच्या बैठका सुरु, भुसे, कांदे यांना पर्याय शोधण्याचे आदेश

Webdunia
मंगळवार, 5 जुलै 2022 (15:25 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  शिवसेना भवन येथे  उद्धव ठाकरे हे बैठका घेत आहेत. त्यांनी पक्ष बांधणीवर जोर दिला आहे. आता तर नाशिक जिल्ह्यात दादा भुसे आणि सुहास कांदे यांना पर्याय शोधा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना दिले आहेत.
 
राज्यात एकीकडे सत्तापालट होऊन भाजपाच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी झालेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नव्या सरकारकडून निर्णयांचा आढावा आणि नवे निर्णय घेतले जात असताना उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पक्ष बांधणीवर जोरदार भर देत आहेत. 
 
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे पुढचं पाऊल काय असणार? याविषयी मोठी चर्चा सुरु होती.  या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच आपण पुढे काय करणार याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार ते शिवसेना भवनात पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्रातील परिस्थितीचा ते आढावा घेत पक्ष संघटना बांधणीवर लक्ष देत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

या खेळाडूने संजू सॅमसनसारखा मोठा पराक्रम केला

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi उद्धव ठाकरें हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना पाठीशी घालत आहे म्हणत अमित शहा यांची घणाघात टीका

उद्धव ठाकरें हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना पाठीशी घालत आहे म्हणत अमित शहा यांची घणाघात टीका

Breaking News :मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर

अजित पवारांना पीएम मोदींची 'एक है तो सेफ है' ही घोषणा आवडली,'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला विरोध

पुढील लेख
Show comments