पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी शिवसेनेनं आज एक मोठं पाऊल उचललं आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आता त्यांच्या पक्षाबद्दल ठोस भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातल्या 3 नेत्यांना निलंबित केलं आहे. या 3 नेत्यांनी काही प्रकरणात गैरप्रकार केले असल्याने त्यांना निलंबित केलं असल्याची माहिती समोर आली आहे.
जगदीश शेट्टी, दीपक सावंत आणि दत्ता दळवी अशी या तिघांची नावे आहेत. मिळालेली माहिती अशी की, जगदीश शेट्टी, दीपक सावंत आणि दत्ता दळवी हे तिघे शिवसेनेच्या नावाखाली गैरप्रकार करत होते. यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. कोणत्याही शिवसैनिकाचे गैरप्रकार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी निलंबित केले आहे. एका नेता पार्टीच्या नावावर पैसे खात होता, तर दुसरा परस्पर वादांवरून वरिष्ठ नेत्याची गुप्त माहिती जमा करत होता असे आरोप या 3 नेत्यांवर ठेवण्यात आले आहेत. गैप्रकार करणाऱ्या कोणत्याही शिवसैनिकाला शिवसेना सहन करणार नाही अशी ठोस भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.