Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी यांना ‘कोरोना’चा संसर्ग

Rashmi
, बुधवार, 24 मार्च 2021 (07:52 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाली आहे. रश्मी ठाकरे यांचा कोव्हिड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या सध्या वर्षा निवासस्थानीच होमक्वारंटाईन झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जे जे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती.
 
मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आदित्य ठाकरे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आता मुख्यमंत्र्यंच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि मुलाला कोरोना झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या घरालाच कोरोनाने विळखा घातल्याने चिंता वाढली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

26 मार्चच्या शेतकरी संघटनांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा