Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उमेश कोल्हेची गळा चिरून हत्या... सोशल मीडियावर केली होती नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट

Webdunia
शनिवार, 2 जुलै 2022 (10:47 IST)
नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानंतर राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैया लाल साहूच्या हत्येचे प्रकरण देशभर तापले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये 54 वर्षीय केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात कोल्हे यांची हत्या भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर कथितपणे पोस्ट शेअर केल्याच्या कारणावरून झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही हत्या 21 जून रोजी झाली होती.
 
नुपूर शर्मा यांच्यावर एका टीव्ही चर्चेत पैगंबरांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यानंतर देशभरात मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत कोल्हे याने दिलेल्या तक्रारीवरून अमरावती येथील सिटी कोतवाली पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून मुदासीर अहमद (22) आणि शाहरुख पठाण (25) या दोघांना 23 जून रोजी अटक केली होती.
 
पोलिसांच्या चौकशीत आणखी चार जणांचा सहभाग उघड झाला. त्यापैकी अब्दुल तौफिक (24), शोएब खान (22) आणि अतीब रशीद (22) या तिघांना 25 जून रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणातील दुसरा आरोपी शमीम अहमद फिरोज हा फरार आहे.
 
ही घटना 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान घडली. त्यावेळी उमेश कोल्हे हे त्यांचे अमित मेडिकल स्टोअर हे दुकान बंद करून घरी जात होते. यावेळी 27 वर्षीय संकेत आणि त्याची पत्नी वैष्णवी हे त्याच्यासोबत दुसऱ्या स्कूटरवर होते. संकेत याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही प्रभात चौकातून जात असताना आमची स्कूटर महिला महाविद्यालय न्यू हायस्कूलच्या गेटजवळ आली असता अचानक माझ्या वडिलांच्या स्कूटीसमोर मोटारसायकलवरून दोघे आले.
 
त्यांनी माझ्या वडिलांची दुचाकी अडवली आणि त्यातील एकाने त्यांच्या मानेच्या डाव्या बाजूला चाकूने वार केल्याचे संकेतने पोलिसांना सांगितले. त्यानंतर माझे वडील पडले आणि त्यांच्या शरीरातून रक्तस्त्राव झाला. मी माझी स्कूटर थांबवली आणि मदतीसाठी ओरडू लागलो. दुसरा एकजण आला आणि तिघांनी मोटारसायकलवरून पळ काढला.
 
आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने उमेश कोल्हे यांना जवळच्या ऍक्सॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमरावती शहर पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींकडून अशी माहिती मिळाली आहे की त्यांनी दुसऱ्या आरोपीची मदत घेतली होती, ज्याने त्यांना पळून जाण्यासाठी कार आणि 10,000 रुपये दिले होते."
 
इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, “उमेश कोल्हेने नुपूर शर्माला सपोर्ट करणारी एक सोशल मीडिया पोस्ट व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्याचे तपासादरम्यान समजले आहे. चुकून त्याने ती पोस्ट मुस्लिम सदस्यांसोबत ग्रुपमध्ये शेअर केली. उमेशचे ग्राहकही त्या ग्रुपमध्ये होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने म्हटले आहे की, हा पैगंबराचा अपमान आहे आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Gas Cylinder:रेशनकार्ड धारकांना सरकार देत आहे 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर

बटाट्यावरून वाद, वृद्ध महिलेवर हल्ला, नागपूरची घटना

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव फायनल, सस्पेन्स आज संपणार?

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

पुढील लेख
Show comments