लुटेरी दुल्हन लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दागिन्यांसह पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लघुशंकेच्या बहाण्याने नववधूने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पळ काढला. मात्र पोलिसांनी लुटेरी दुल्हनसह चौघांना नांदेडमध्ये अटक केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अंबीतील ही घटना असून यात तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी नांदेडच्या वधूसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
18 सप्टेंबर रोजी अंबी येथील विश्वनाथ भोसले या तरुणाचा विवाह नांदेड येथील एका तरुणीसोबत झाला. दुसऱ्या दिवशी लघुशंकेच्या बहाण्याने नववधू विवाहातील दागिन्यांसह पसार झाली यात तिच्या इतर सहकाऱ्यांनी तिला मदत केली. मात्र उस्मानाबाद पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि चार जणांना नांदेड येथून अटक केली आहे.
एका इतर घटनेत तब्बल आठ लग्न करुन सासरच्यांना गंडवणारी दरोडेखोर वधू अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली. सासरच्या घरातून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या तरुणीसह चौघांना अटक झाली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीची पोलिसांनी एचआयव्ही चाचणी केली असताना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता पोलीस तिच्याशी लग्न केलेल्या सर्व वरांचीही एचआयव्ही चाचणी घेणार आहेत.