Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक मध्ये आजपासून राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

Webdunia
शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (09:27 IST)
स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. युवा महोत्सवाचे उ‌द्घाटन १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. महोत्सवाच्या उद्घाटनाआधी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा रोड शो होईल. राष्ट्रीय युवा महोत्सवाची सुरुवात १२ जानेवारीला तपोवन मैदानावर होईल. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण, युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
 
यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सचिव मीता राजीव लोचन, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे आदी उपस्थित होते.
 
मंत्री श्री. ठाकूर म्हणाले की, १२ ते १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता युवा कला महोत्सव सुरु होईल. भारताची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी चमकदार आहे. खेळाडू आपली कामगिरी उंचावत विविध स्पर्धांमध्ये पदके पटकावत आहेत. त्यामुळे २०२६ ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत प्रबळ दावेदारी करणार आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @२०४७’  संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
 १२ ते १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता खाद्य महोत्सव, महा युवा ग्राम हनुमान नगर येथे सुरु होईल.
 १२ ते १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र युवा प्रदर्शन महा युवा ग्राम येथे सुरू होईल.
१२ ते १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, १३ ते १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता समूह आणि सोलो लोकनृत्य प्रदर्शन, महाकवी कालिदास कलामंदिर येथे होईल.
१३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० वाजता फोटोग्राफी स्पर्धा महाकवी कालिदास कलामंदिर हॉल नं. १ येथे होईल.
१३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर हॉल क्रमांक दोनमध्ये उ‌द्घाटन आणि सादरीकरण होईल.
१३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० वाजता गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये गट आणि सोलो लोकगीत प्रदर्शने होईल.
१३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० वाजता गंगापूर रोडवरील उदोजी महाराज संग्रहालयात युवा कला शिबिर, पोस्टर मेकिंग आणि कथा लेखन होईल.
१३ ते १४ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.१५ वाजता प्रेरणादायक (सुविचार) कार्यक्रम होईल.
१३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजता साहसिक कार्यक्रम अंजनेरी, बोट क्लब, चामार लेणी आणि महायुवा ग्राम, हनुमान नगरमध्ये होईल.
१३ ते १५ जानेवारी रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजता स्वदेशी खेळ महायुवा ग्राम, हनुमान नगरमध्ये होईल.
१५ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १.१५ वाजता युवा संमेलन महायुवा ग्राम, हनुमान नगरमध्ये होईल.
राष्ट्रीय युवा महोत्सव १६ जानेवारीला विभागीय क्रीडा संग्रहालयात एका सोहळ्यात समारोप होईल.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग,कोणतीही जीवितहानी नाही

LIVE:निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीक हत्याकांड प्रकरणात अकोल्यातून 26 वी अटक

आईने आपल्या दोन निष्पाप मुलांची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली

पुढील लेख
Show comments