Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, वडापावने घेतला तरुणाचा जीव, वडापाव दुकानदाराने केला ग्राहकाचा खुन

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2022 (07:49 IST)
अहमदनगरमध्ये वडापाव एका तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे. वडापाव पाच रुपये कमी पडले म्हणून वडापाव दुकानदाराने ग्राहकाचा खुन केला आहे. अहमदनगर च्या एमआयडीसी भागातील सह्याद्री चौकात ही घटना घडली असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण कांबळे हा तरुण वडापावच्या दुकानावर गेला होता. दुकानदाराने त्याला वडापाव 20 रुपयाला असल्याचं सांगितल्यानंतर प्रवीणने त्याला पाच रुपये कमी करण्यास सांगितलं. यावरुन दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. या वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं. वडापाव दुकानदाराच्या मदतीला आलेल्या आसपासच्या काही लोकांनी मिळून प्रवीण कांबळे याला बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या प्रवीणला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 
प्रवीण कांबळे याच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही

अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे

दिवटा - संत समर्थ रामदास

जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

कर्नाटकला जाणारी महाराष्ट्र राज्य बस सेवा बंद करण्याचे राज्य सरकारचे आदेश

LIVE: नागपूर, मुंबई, पुण्यातील प्रवाशांना गाड्यांची भेट, मध्य रेल्वेकडून होळीनिमित्त विशेष गाड्या धावणार

नागपूर, मुंबई, पुण्यातील प्रवाशांना गाड्यांची भेट, मध्य रेल्वेकडून होळीनिमित्त विशेष गाड्या धावणार

बेंजामिन नेतान्याहूच्या धमकीनंतर हमासने 5 इस्रायली ओलिसांची सुटका केली

IND vs PAK :भारत उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकणार, सामना कधी आणि कुठे होणार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments