Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कानात हेडफोन लावून चालणे तरुणीला महागात पडले

headphones
, बुधवार, 25 मे 2022 (13:37 IST)
बरेच लोक गाडी वर चालताना, रस्त्यावरून जात असताना कानात हेडफोन लावतात. कानात हेडफोन लावून चालणे रास्ता ओलांडणे, रेल्वेच्या रुळावरून चालणे हे धोकादायक आहे. आपण अनेकदा हेडफोन लावल्यामुळे झालेल्या अपघातात बद्द्दल वाचले आणि ऐकले आहे. तरीही लोक सर्रास कानात हेडफोन लावून रस्त्याने जातात. या गोष्टीमुळे कित्येकांना आपला जीव गमवावा लागतो. जळगावात शिवाजीनगर भागात असाच धक्कादायक प्रकार घडला असून एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. कामावरून एक तरुणी आपल्या घरी जात होती. तिने कानात हेडफोन लावले होते. ती रेल्वेचे रूळ क्रॉस करत असताना सुसाट वेगाने येणाऱ्या रेल्वेची धडक तिला बसली आणि ती दूरवर फेकली गेली आणि डोक्याला जबर मार लागून तिचा मृत्यू झाला. स्नेहा वैभव उज्जैनकर (19) असे या मयत तरुणीचे नाव असून ती आपल्या आईवडिलांसह शिवाजीनगरच्या धनाजी काळे नगरात राहत होती. ती एका कॉस्मेटिकच्या दुकानावर कामाला होती. 
 
दररोज प्रमाणे स्नेहा 23 मे रोजी कामावरून निघाली ती चालत होती आणि तिने हेडफोन कानात लावले होते. जळगाव तहसील कार्यालया जवळून शिवाजी नगर कडे जाण्यासाठी रूळ ओलांडताना भुसावळ कडून जळगाव कडे जाणाऱ्या एका गाडीची तिला जोरदार धडक बसली आणि तिचा जागीच मृत्य झाला. लोहमार्ग पोलिसांनी घटनेची माहिती मिळतातच घटनास्थळी दाखल होऊन अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. प्रकरणाचा तपास करत आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई: बाईकसाठी नवा नियम,दुचाकीवर मागे बसणाऱ्याला देखील हेल्मेटसक्ती