Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाशीम पंचायत समितीचा निर्णय,आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

Washim Panchayat Samiti
, सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (16:30 IST)
काही जण आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देतात. मात्र अशा अशा मुलांना असे वागणे चांगलेच महागात पडणार आहे. आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील ३० टक्के रक्कम आईवडिलांना दिली जाणार आहे.
 
आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ३० टक्के रक्कम आईवडिलांच्या बँक खात्यात जमा करावी लागणार आहे. असा निर्णय विदर्भातील वाशीम या जिल्हा परिषदेने घेतला. वाशीम पंचायत समितीच्या सभापती रेश्मा गायकवाड यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडला आहे. या ठरावाचे सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आणि ठराव मंजूर झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्ही त्यांच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची गरज काय?