Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाश्वतते करता पाण्याची साठवण आणि संवर्धन

water harvesting
Webdunia
पृथ्वी वरील पर्यावरण ग्लोबल वार्मिंगच्या विळख्यात सापडलेले असतांना दिवसेंदिवस कमी होत जाणारे पर्जन्य प्रमाण हि महाराष्ट्रासाठी एक गंभीर समस्या बनत आहे. त्यात उद्योग जगताचा विस्तार होत असताना पाण्याची गरज देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्यासोबतच पावसाचे पाणी साठवणे, जमिनीत जास्तीत जास्त झिरपण्याचे आणि टिकवून ठेवण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. यामुळे वर्षभर पाण्याच्या टंचाई पासून बचाव होणे शक्य आहे तसेच जमिनीत पाणी झिरपून ओलावा टिकून राहिल्याने वृक्षवल्ली टिकून राहण्यास मदत होईल.
 
यंदा पावसाने चांगली सुरुवात केलेली असून पाण्याची साठवण करण्यास हीच योग्य वेळ आहे. जेणेकरून वर्षभर पाण्याच्या टंचाई पासून आपल्याला स्वत:चा बचाव करता येऊ शकतो. द्राक्षांच्या रसापासून नैसर्गिक प्रक्रियेद्वारे अंतिम उत्पन्न तयार होत असल्याने सुलास आपला उद्योग चालवण्यास फार कमी पाणी लागते. तरीही नैसर्गिक स्त्रोतांचा फायदा आणि महत्व जाणून घेऊन आपले विनियार्डस्, लॉन्स किंवा वाईनरी माधिल कामांकरिता जास्तीत जास्त पाणी नैसर्गिक स्त्रोतांपासून मिळवण्यासाठी सुला अनेक लहान मोठे प्रकल्प राबवते. ज्यामुळे बाह्य स्त्रोतांपासून किंवा जमिनीतून पाणी घेण्याची गरज न भासता आपल्या गरजा पूर्ण करता येतात. तसेच बह्यस्त्रोतांकडून किंवा जमिनीतून पाणी न घेतल्याने त्या स्त्रोतांमधील पाण्याची बचत होते व त्याचा उपयोग इतर गरजेच्या गोष्टींकरता इतरांना होऊ शकतो.
 
शाश्वत सुला अंतर्गत असलेल्या अनेक कार्यपद्धतींपैकी एक म्हणजे रेन ‍वॉटर हार्वेस्टिंग आणि कंजरवेशन. महाराष्ट्रातील अनियमित पाऊस आणि काही ठिकाणी असणारी दुष्काळ सदृश परिस्थिती पाहता सुला वापरत असलेल्या पाणी साठवण्याच्या आणि संवर्धनाच्या पद्धती सोप्या असून अनेक शेतकऱ्यांना आणि घरांना देखील उपयुक्त ठरू शकतात.
 
नाशिक, दिंडोरी आणि जउळके या तीन ठिकाणी असणाऱ्या वाईनरी आणि द्राक्ष शेती साठी रेन ‍वॉटर हार्वेस्टिंग आणि कंजरवेशन या पद्धतीं अत्त्यंत उपयुक्त ठरत आहेत. याद्वारे पाणी वाईनरीतील टँक्स आणि बॅरल्स स्वच्छ करण्यासाठी देखील वर्षभर वापरात आणले जाते जेणेकरून बाह्य स्त्रोतांपासून ते घेण्याची गरज राहत नाही. या प्रकल्पा द्वारे सुला आपली वर्षभराच्या पाण्याची गरज भगवते आणि वॉटर कंजरवेशन द्वारे पाण्याची बचत व पुनर्वापर करते.
 
वाईनरीतील सर्व इमारतींची छते उतरती असून पाइपलाईन द्वारे पावसाचे सर्व पाणीवॉटर हार्वेस्टिंगच्या तळ्यात जमा होते. अशाच पद्धतीने जउळके येथे पावसाचे पाणी साठवले जाते. दिंडोरी येथील हजारो एकर्सच्या विनीयार्ड्स मध्ये जलसंवर्धनाच्या अनेक लहान लहान उपाय योजना केल्या गेल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या काही लहान तळ्यांमध्ये जमिनीत झिरपलेले पावसाचे पाणी साठवले जाते. यासाठी डोंगराच्या पायथ्याशी किंवा उतार असलेल्या जमिनीच्या टोकास तळे बनवले जाते आणि जवळपास असलेल्या टेकड्या, डोंगर व उतारावरील पाणी जमिनीत झिरपून या तळ्यात जमा होते. या ठिकाणी असलेल्या बसाल्ट खडकामुळे कमीत कमी पाणी जमिनीत झिरपते, आणि तळ्यात टिकून राहते. आपल्या प्रत्येक विनियार्ड ची भौगोलिक रचना तपासून तयार केलेली ही तळी तीन कोटी लिटरपेक्षा ही अधिक पाणी साचवतात. शेतकरी या सोप्या पद्धतीचा वापर करून आपल्या शेतांना लागणारी अधिकाधिक पाण्याची गरज भागवू शकतात आणि नद्या, कालवे, यांवर त्यांना कमीत कमी अवलंबून राहावे लागेल.
 
एफ़्लुएन्त त्रीत्मेंत (ई टी पी) – या तंत्रज्ञान द्वारा वाईनरी, रेस्तोरांत, व टेस्टिंग रूम येथील सर्व सांडपाणी एकत्र करून पुन्हा शुद्ध केले जाते. ई टी पी प्लांट द्वारा प्रतिदिन ऐंशी हजार लीटर पाण्यावर प्रक्रिया होते. हे पाणी सुलाच्या गार्डन्स, अँम्फीथियेटर, येथील लॉन्स करिता वापरले जाते. यामुळे सुला कायम हिरवे गार राहण्यास मदत होते आणि पाण्याच्या बाह्य स्त्रोतांवर खर्च करायची गरज राहत नाही. ई टी पी प्लांट द्वारा प्रती वर्ष २.५ कोटी लिटर पाण्याची शुद्धी होते, म्हणजे हिशोब करायचा झाला तर एवढे पाणी हे १० एकर शेतीला नऊ महिने पुरेल!
 
या सर्व पद्धतींचा वापर करून सुला आपल्या पाण्याच्या गरजेचा साठ ते सत्तर टक्के वाटा स्वतःच उचलत आहे. शेतकरी देखील या सर्व पद्धतींचा उपयोग करून घेऊ शकतात. त्यासाठी अधिक माहिती मिळवण्या करिता सुला आपणांस मार्गदर्शन करू शकते. संपर्क साधा: नाना शेळके: ९८६०१९००२०

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: औरंगजेबाची कबर असलेल्या खुलदाबादचे नाव बदलण्याची मागणी तीव्र

मुंबई: हाय स्पीड टेम्पोने सिग्नल तोडला, वृद्ध महिलेचा मृत्यू

पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक

मुंबई-पुणे महामार्गावरील दापोडी परिसरात रात्री कारला भीषण आग

बंगळुरूने मुंबईचा १२ धावांनी पराभव केला, कृणाल पंड्याने घेतले चार विकेट्स

पुढील लेख
Show comments