Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील, त्यांचं निलंबन मागे घेऊ : परब

Webdunia
शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (15:08 IST)
संपकरी असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्याना राज्य सरकारकडून शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे.
 
अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एसटी संपाबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका स्पष्ट केली. “महाराष्ट्रातल्या सगळ्या डीसींशी बोललो. त्यांच्याकडे कर्मचारी जाऊन सांगतायत की आम्हाला कामावर यायचंय पण काही लोकांकडून कामावर येऊ दिलं जात नाहीये. काही सांगतायत, आम्ही निलंबित आहोत म्हणून कामावर जाता येत नाहीये. त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एक संधी दिली पाहिजे”, असं अनिल परब यांनी सांगितलं.
 
आम्ही निर्णय घेतलाय, की जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील, त्यांचं निलंबन मागे घेऊ. जिथे डेपो ५० टक्क्यांपेक्षा जास्त चालू होईल, त्यांना त्याच डेपोमध्ये काम दिलं जाईल. पण जिथे तेवढी कामगार संख्या नाही होणार, त्यांना आजूबाजूच्या डेपोमध्ये सामावून घेतलं जाईल”, असं अनिल परब म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मतदानापूर्वी नाशिकच्या हॉटेलमधून 1.98 कोटी रुपये जप्त

महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 2 नेत्यांवर दगडफेक, डोक्याला दुखापत

बारामतीत राजकीय गदारोळ, युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरूमची झडती

मतदानापूर्वी भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात एफआयआर

मोदी-शहा यांच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 किती महत्त्वाची, भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्षही यावर अवलंबून

पुढील लेख
Show comments