Festival Posters

कोकणातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्प काय आहे ? स्थानिकांचा का आहे विरोध; सविस्तर जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 26 एप्रिल 2023 (15:11 IST)
बारसु प्रकल्पमध्ये राज्याचे राजकारण आता प्रचंड तापताना दिसत आहे. सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप करत, विरोधकांनी वातावरण तापवल आहे. त्यातच आता यावरून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नवीन खुलासा केला असून उद्धव ठाकरे यांच्यासह मविआवर त्यांनी निशाणा साधला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हे नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी बारसु रिफायनरी बद्दल खुलासा केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर दडपशाहीचा आरोप करत जालियनवाला बाग हत्याकांड होईल अशी शंका व्यक्त करत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरीसाठी पत्र दिले होते. आज अचानक महाविकास आघाडीतील नेते विरोध करु लागले आहेत, हा दुटप्पीपणा आहे. स्थानिकांचा नाही, काही लोकांचा विरोध आहे. एकीकडे पत्र द्यायचं आणि दुसरीकडे विरोध करायचा, हा दुटप्पीपणा असल्याचे उदय सामंत म्हणाले आहेत.
त्यामुळे आपण जाणून घेवू कि, कोकणातील प्रस्तावित काय आहे बारसू रिफायनरी प्रकल्प? स्थानिकांचा का आहे विरोध; जाणून घ्या सविस्तर
 
नेमके प्रकरण काय?
कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी 'रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग' प्रस्तावित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे.
महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे.
या प्रस्तावित रिफायनरीसाठी सोमवारपासून मातीचे परीक्षण करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या रिफायनरीलाच विरोध असल्याने स्थानिकांनी या सर्वेक्षणाविरोधात कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली.

मातीचे सर्वेक्षण कशासाठी?
बारसू परिसरात औद्यागिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी या भागातील जमीन योग्य आहे की नाही यासाठी महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाकडून प्राथमिक सुसाध्यता तपासणी करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण आणि भू सर्वेक्षण करण्यात आले होते.
 
आंदोलकांचा एकढा विरोध का?
प्रस्तावित रिफायनरी जेथे होणार आहे त्या माळरानावर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. या रिफायनरीमुळे माळरानावरची एका महिलेची शेती गेली. काल आंदोलक करताना, उन्हामुळे चक्कर आल्यानंतरही तिने रुग्णालयात जाण्यासाठीही नकार दिला. राजापूरमधील महिलेने 'जीव गेला तरी इथेच थांबेन' असा इशारा दिला हाेता.
 
या प्रकल्पामुळे विकत घेतलेल्या जमिनी धोक्यात येतील तसेच मासेमारी, सागरी जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती रहिवाशांना आहे.रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागांवरही परिणाम होईल असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
उर्जा, पेट्रोलियम,ऑइल प्रकल्पांना कोकणात विरोध का होतो?
नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प, एन्रॉन प्रकल्पांना झालेल्या विरोधानंतर राजापूर रिफायनरी प्रकल्पालाही बंद करा अशी मागणी आंदोलक करत आहेत.
 
कोकण निसर्गसौंदर्याने नटलेले असून आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा टिकाव्यात ही स्थानिकांची भूमिका आहे. याशिवाय येथील रहिवाशांचा रोजगार मासेमारी हा असल्याने या तेलशुद्धीकरणाच्या प्रकल्पांमुळे समुद्रात गरम पाणी तसेच आणखी काही घटकांच्या विसर्गामुळे मासे मरतील व जैवविविधतेवर धोका निर्माण होऊन त्याचा रोजगारावर परिणाम होईल यामुळे ऊर्जा, पेट्रोलियम, तेलशुद्धीकरणाच्या प्रकल्पांना कोकणात विरोध होतो.
 
किती एकरात असेल बारसू रिफायनरी प्रकल्प?
राजापूर तालुक्यातील बारसू येथे 3 हजार 400 एकर जमिनीवर क्रूड रिफायनरीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. बारसू रिफायनरीसाठी चाचण्या करण्यासाठी 84 कूपनलिका खोदायच्या आहेत. तसेच क्रूड टर्मिनलसाठी साठी 501 एकर जमीन लागणार आहे. ही जमिन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन

International Anti Corruption Day 2025 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती

महायुती आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवेल-उपमुख्यमंत्री शिंदे

शिवसेनेचे २२ आमदार भाजपमध्ये सामील होणार! आदित्य ठाकरेंच्या दाव्याने महाराष्ट्रात राजकीय गोंधळ

गोव्यात आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबई सतर्क, क्लब आणि मॉल्समध्ये अग्निशमन तपासणी

पुढील लेख
Show comments