Dharma Sangrah

पद मागण्यात गैर काय, भुजबळांची मागणीही योग्य; अजित पवार

Webdunia
सोमवार, 26 जून 2023 (08:56 IST)
पक्ष संघटनेत पद मागितले तर त्यात वाईट काय आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पक्ष संघटनेची जबाबदारी मागितली त्यात काही गैर नसल्याचे पवार म्हणाले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
 
पुढे बोलताना पवार म्हणाले, मी पक्षाच्या व्यासपीठावर माझी मागणी मांडली आहे. तेथे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी निर्णय पक्षाला घ्यायचा असतो. भुजबळ यांनी मागणी केली आहे, तो त्यांचा अधिकार आहे. सर्वांना बरोबर घेवून जायचे असेल तर पक्षात सर्व घटकांना प्रतिनिधित्व का मिळू नये, त्यामुळे त्यांनी केलेली मागणी योग्यच आहे. यासंबंधी आम्ही चर्चा करू. कोणत्याही पक्षात लोकशाही मार्गाने मते मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. पक्ष घेईल तो निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल.
   
राष्ट्रवादीच्या संघटनेत यापूर्वी छगन भुजबळ, बबनराव पाचपुते, आर. आर. पाटील, अरुण गुजराथी, सुनील तटकरे, जयंत पाटील, मधुकर पिचड यांनी अध्यक्षपदे भूषवली आहेत. मी तर जे योग्य वाटेल ते पद द्या अशी मागणी केली असल्याचे पवार म्हणाले. 
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ऑस्ट्रेलियात यहूदियों वर दहशतवादी हल्ला; पाकिस्तानशी काय संबंध?

विधानसभेत १६ विधेयके मंजूर, हिवाळी अधिवेशन संपले, पुढील अधिवेशन मुंबईत होणार

पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ५ वर्षांच्या मुलीसोबत दुष्कर्म आणि निर्घृण हत्या

समृद्धी एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात भाऊ आणि बहिणीचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी

मालमत्तेच्या वादातून भावाची हत्या, पोलिसांनी चार तासांत आरोपीला अटक केली

पुढील लेख
Show comments