Marathi Biodata Maker

परमबीर सिंह जायचे तिथे सचिन वाझे जायचा --- नवाब मलिक

Webdunia
शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (08:13 IST)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अँटालिया प्रकरणातील मास्टरमाइंड आहेत. एनआयएलाही त्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणातून परमबीर सिंग यांना वाचवण्याचा केंद्र सरकार  आटोकाट प्रयत्न करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ते  मुंबईत  बोलत होते.
 
यावेळी नवाब मलिक (यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेसह केंद्रीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे. संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांविरुद्धही ईडी याचप्रकारे कारवाई करत आहे. देशभरात केंद्रीय तपास यंत्रणांकडून हेच उद्योग सुरु आहेत. महाराष्ट्रात कितीही दबाव निर्माण केला तरी सरकार झुकत नाही हे पाहून भाजपकडून वेगवेगळे डावपेच खेळले जात आहेत. परंतु, केंद्रातील भाजप सरकारने सत्तेचा कितीही दुरुपयोग केला तरी महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षांमधील कोणताही नेता दबावाला बळी पडणार नाही, असे नवाब मलिक (nawab malik) यांनी म्हटले.
 
‘जिथे परमबीर सिंह जायचे तिथे सचिन वाझे जायचा’
 
 नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या कनेक्शनवर बोट ठेवले. सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात झालेली नाही. सचिन वाझे पोलीस दलातून निलंबित झाला असला तरी तो परमबीर सिंह यांच्यासाठी काम करत होता. ज्याठिकाणी परमबीर सिंह यांची पोस्टिंग व्हायची, त्याठिकाणी सचिन वाझे असायचा. परमबीर सिंह यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांची एक टोळीच होती, असेही नवाब मलिक यांनी म्हटले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments