Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मी काय एम आय एम चा नेता आहे का - राऊत भडकले

मी काय एम आय एम चा नेता आहे का - राऊत भडकले
, बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (09:59 IST)
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून मी प्रस्ताव काय होता यावर पुढे  येऊन बोलत असून, त्यातही  शिवसेनेने प्रस्ताव दिला नाही, असं म्हणत असाल तर मग मी काय एमआयएमचा नेता आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील 24 ऑक्टोबरला निकालानंतर ठरल्याप्रमाणे 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार सत्तावाटप व्हावी, हे सांगितले होते. असे राऊत म्हणाले आहेत.
 
राऊत पुढे म्हणाले की म्हणाले, राज्यातून 48 खासदार निवडून लोकसभेत प्रतिनिधित्व करतात, तर आपल्या विधानसभेत 288 आमदार असून, देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रात आहे. हे इतकं मोठं आणि महत्त्वाचं राज्य आहे. मात्र, काही लोकांच्या हट्टासाठी हे मोठं राज्य राष्ट्रपती राजवटीकडे ढकललं जर जात असेल तर शिवसेना असं कधीच होऊ देणार नाही. भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव मिळाला नसल्याचं स्पष्ट केले आहे. राऊत म्हणाले, “भाजप-शिवसेना युती होती. आमचं युती करतानाच ठरलं होतं. मात्र, शरद पवारांचं आणि आमचं काहीही ठरलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी प्रस्ताव आला नाही हे म्हणणं योग्य आहे.” सत्तास्थापनेबाबत शिवसेना भाजपसोबत चर्चा करणार की नाही यावरही संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाप्परे, कुस्ती खेळतांना पैलवानाचा मृत्यू