suvichar

अजित पवार बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार का ?

Webdunia
शनिवार, 2 जुलै 2022 (21:30 IST)
महाविकास आघाडीतील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते अद्यापही पॉझिटिव्ह आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे ते आयसोलेशनमध्ये होते. मात्र, उद्या ३ जुलै आणि ४ जुलै रोजी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. परंतु पवार बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
 
राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाला सुरूवात झाली. वारंवार आवाहन केल्यानंतरही शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.
 
महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. मात्र, या शपथविधी सोहळ्यानंतर आता येत्या अधिवेशनात नवनिर्वाचित सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेत कोण? 'ही' नावे चर्चेत

एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळात सापडले, उपमुख्यमंत्री एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले

LIVE: प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता नाही ठामपणे नाकारली

नाशिक: कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात, काळाराम मंदिरात अयोध्या शैलीतील भव्य पितळी धर्मध्वजाची माजी राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्थापना

विराटच्या टीममेटचे दुर्दैवी निधन

पुढील लेख
Show comments