Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संपूर्ण पोलीस चौकशीनंतर काय तो निर्णय घेतला जाईल : शरद पवार

Webdunia
शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (16:08 IST)
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. मात्र, हे आरोप करणाऱ्या व्यक्तीविषयी त्यानंतर अन्य काही गोष्टी पुढे आल्यात. आता ही बाब पोलिसात गेली आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतर  काय तो निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरले आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांनी मीडियाशी बोलताना दिली. 
 
याआधी शरद पवारयांनी सांगितेल की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचे स्वरुप गंभीर आहेत. पक्ष म्हणून निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे आता राष्ट्रवादी काय निर्णय घेणार याची उत्सुकता होती. मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण लागल्यानंतर पवार यांनीही सावध भूमिका घेतली आहे. एका महिलेने आरोप केल्यानंतर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची चौकशी पोलीस संपूर्ण चौकशी करतील.
 
तसेच धनंजय मुंडे हे मला स्वत: भेटले. यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मला दिली, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले. तसेच तक्रारीचे स्वरुप गंभीर आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर त्या महिलेले तक्रार दाखल केल्यानंतर वेगळीच माहीती मीडियाच्या माध्यमातून पुढे आली आहे. त्यामुळे आता पोलीस चौकशी करतील. त्यानंतर पुढील पाऊल उचलेल जाईल, असे स्पष्ट संकेत पवार यांनी दिले आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments