Dharma Sangrah

मंत्री छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार?

Webdunia
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (08:10 IST)
नाशिक :मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यात आता मनोज जरांगे यांनी मोठा दावा केला आहे. छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांना भाजपमध्ये पलटी मारायची असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे.
छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांना पलटी मारायची सवय आहे. त्यामुळे त्यांना भाजपची ऑफर असेल असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भुजबळ तेढ निर्माण करणारे वक्तव्य करतायेत.आमचे बॅनर फाडले जात आहेत. त्यामुळे अजित पवारांनी भुजबळांना रोखावें अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठ्यांना त्रास देण्यासाठी ओबीसींना सरकारची फूस असल्याचा आरोपही मनोज जरांगेंनी केला आहे.बॅनर फाडणारे, जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाहीये, दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसींना मदत करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केला आहे.
 
फडणवीसांची ऑफर
छगन भुजबळ यांना भाजपकडून काहीतरी ऑफर आली असणार कारण गृहमंत्री त्यांना थांबवत नाहीए आणि काही बोलतही नाहीएत, असा दावाही जरांगे पाटील यांनी केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments