suvichar

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री होणार?

Webdunia
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (22:12 IST)
मुंबई – राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत शासन स्तरावर अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
 
२२ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत काही माध्यम प्रतिनिधींनी सुपर मार्केटमधील वाईन विक्री धोरणाबाबत प्रश्न विचारला असता याबाबत मागील सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सविस्तर निवेदन केले होते. यामध्ये सदर निर्णयांच्या अनुषंगाने याबाबतचा प्रस्ताव हा राज्यातील जनतेच्या सूचना तसेच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी
 
जनतेसमोर ठेवला आहे. प्रस्तावावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पूर्ण अभ्यासाअंती मंत्रिमंडळ याबाबतचा निर्णय घेईल, असे निवेदन केले होते. मात्र काही माध्यमांनी याबाबत बोलण्याचा विपर्यास करून वृत्त दिले आहे. राज्य शासन सुपर मार्केटमधील वाईन धोरणांच्या बाजूने असे संकेत असल्याचे काही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.असा कोणताही निर्णय झालेला नसून निवेदनात सांगितल्याप्रमाणे शासन सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत पूर्ण अभ्यासांती निर्णय घेईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पुण्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी सुरक्षा रक्षक फरार

डोंबिवली स्टेशनजवळ लोकल ट्रेन रुळावरून घसरली

मुंब्रामध्ये संदल मिरवणुकीदरम्यान डीजे नाचणाऱ्या लोकांवर पडून अपघात

LIVE: नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

भाजपने मुंबई बीएमसीमध्ये जिमखाना इमारतीत नवीन सभागृह बांधण्याची योजना आखली

पुढील लेख
Show comments