Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत महिलेवर बलात्कार, संशयितावर गुन्हा दाखल

Webdunia
बुधवार, 10 जानेवारी 2024 (09:53 IST)
जळगाव : धरणगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेला तिच्या मुलासह पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव शहरातील एका भागात 26 वर्षीय महिला आपल्या पती व मुलासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा संशयित आरोपी भुषण सुकलाल महाजन याने महिलेचा अंघोळ करताना व्हिडीओ काढून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि मुलगा आणि पतीला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात घुसून अत्याचार केला. जून 2023 ते 16 डिसेंबर 2023 दरम्यान त्याने 3 ते 4 वेळा महिलेवर अत्याचार केला. या अत्याचाराला कंटाळून महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार 8 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भूषण महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख
Show comments