Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपाचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही : मुनगंटीवार

Webdunia
गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (17:03 IST)
भाजपाचे जे आमदार राष्ट्रवादीमध्ये येतील, त्यांना पोटनिवडणुकीत जिंकवण्यासाठी तीन पक्ष मिळून एकच उमेदवार देऊ आणि भाजपाचा पराभव करू, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. याबाबत बोलताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले,”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनेकदा सांगतात की भाजपाचे २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. तुमच्या सरकारला आता सत्तेवर येऊन १२ महिने झाले. तुम्ही अद्याप भाजपाचा एकही आमदार फोडू शकला नाहीत. तुमच्यात जर ताकद असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी भाजपाचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही”, असं थेट आव्हान त्यांनी अजित पवारांना दिलं.
 
भाजपाचे २० आमदार आमच्या पक्षात येणार असं काही लोकं सांगतात. २० तर सोडाच, पण १२ महिन्याचे १२ आमदारही तुम्हाला फोडता आले नाहीत. आम्ही लिहून देतो की आमचे जे आमदार तुमच्या पक्षात यायला तयार असतील, त्या आमदारांची आणि तुमची मिटींग आम्हीच घडवून देतो. तुम्हाला तुमच्या बळावर खूप विश्वास असला तरी आम्हाला आमच्या विचारांवर आणि निष्ठेवर पूर्ण विश्वास आहे”, असेही मुनगंटीवार म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे

Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली

Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, मानहानीच्या खटल्याची कार्यवाही स्थगित

सुनेच्या व्हर्जिनिटीवर प्रश्न, मृत मुलीची डीएनए चाचणी करण्यासाठीही दबाव, घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल

ठाण्यात मॅट्रिमोनियल साइटवरून 30 महिलांची फसवणूक, आरोपीला अटक

LIVE: बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात पोलीस जबाबदार

बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात पोलीस जबाबदार,मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments