Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्ल्लीतून अकोला आलेल्या तरुणीचा मित्राने केला निर्घृण खून, आरोपी पसार

Webdunia
बुधवार, 24 जुलै 2024 (17:45 IST)
अकोलातून एका तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ही महिला अकोला दिल्लीहून कामाच्या निमित्ताने आली होती. तिच्या मित्राने तिचा खून केल्याचे समोर आले आहे. शांतीप्रिय प्रशांत कश्यप असे या मयत महिलेचे नाव असून 26 वर्षीय ही तरुणी आसामची राहणारी असून अनेक वर्षांपासून दिल्लीत रहात होती. दिल्लीत तिची भेट यवतमाळ जिल्ह्यातील राहणाऱ्या कुणाल उर्फ सनी शृंगारे याच्याशी झाली.नंतर त्यांची मैत्री झाली. आरोपी कुणाल ने तिला अकोल्यात काम मिळवून देण्याचा आमिष दाखवून अकोला बोलावले. 21 जुलै रोजी ती अकोल्यातील मूर्तिराजपूर येथे पोहोचली. 

आरोपी काम शोधायला तिला घेऊन एका वाईन बार मध्ये गेला. मात्र बार मालकाने काम देण्यास नकार दिल्यामुळे ते तिथून निघाले.   
कुणाल देखील कामाच्या शोधात होता. दोघांनी मूर्तिराजपूर येथे राहण्याचा निर्णय घेतला आणि एका परिसरात खोली घेऊन राहायचे. दोन दिवसानंतर त्यांच्यात वाद झाले कारण कुणाल मद्यपी होता. वाद वाढले आणि रागाच्या भरात येऊन कुणाल ने तरुणीच्या डोक्यात भारी वस्तू घालून हल्ला केला. ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेनन्तर आरोपी कुणाल पसार झाला. 

घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून तपास सुरु केला आहे. तरुणीच्या सोबत राहणाऱ्या मित्रानेच तिचा खून केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.घटनेनंतर कुणाल पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मुंबईत फेसबुकवर लाईव्ह येऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bank Holiday In October : ऑक्टोबर मध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार, यादी पहा

मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, नऊ लाखांचे नुकसान

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका शिवसेना युबीटी नेते संजय राऊत म्हणाले

ठाण्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या11 व्या मजल्यावर आग

पुढील लेख
Show comments