Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अशी मिळणार मोदींना आंदोलनरुपी वाढदिवसाची भेट देणार

Webdunia
गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (22:23 IST)
देशातील युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी ७ वर्षात हे आश्वासन पाळले नाही. रोजगार निर्मिती दूर राहिली जे रोजगार होते ते ही गेले आणि ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारीचा उच्चांक मोदींच्या काळात झाला. युवकांची स्वप्नं धुळीस मिळवून त्यांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरणार असून उद्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदींना आंदोलनरुपी वाढदिवसाची भेट देणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.
 
गांधी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना तांबे पुढे म्हणाले की, मोदी सरकारने युवकांची घोर फसवणूक केली आहे. रोजगार निर्मितीच्या बाबतीत मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून ही बेरोजगारी वाढण्यास केंद्रातील भाजप सरकारची आर्थिक धोरणे कारणीभूत आहेत. त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढत आहे. देशातले उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारीत भर पडत असून फोर्डने नुकतेच भारतातील उद्योग बंद केल्याने प्रत्यक्ष ४ हजार तर अप्रत्यक्ष जवळपास ४० हजार लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. सुशिक्षित तरुणांनी पकोडे तळावे, चहाच्या टपऱ्या चालवाव्या, बुट पॉलीश करावी अशी मोदी व भाजपाची इच्छा आहे. म्हणून तरुणांची फसवणूक करणाऱ्या मोदींना वाढदिवसाची भेट म्हणून राज्यभर सर्व जिल्हा आणि तालुकास्तरावर उद्या शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी आंदोलनरुपी भेट दिली जाणार आहे.

संबंधित माहिती

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

पुढील लेख
Show comments