Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भिवापूर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 5 जुलै 2024 (09:43 IST)
अमरावती जिल्ह्यात भिवापूर धरणात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाचे मित्र सुदैवाने बचावले. अक्षय नसकरी वय वर्ष 28 असे या मयत तरुणाचे नाव आहे.  

सदर घटना गुरुवारी संध्याकाळी घडली असून अक्षय आपल्या दोन मित्रांना भिवापूर धरणावर फिरायला आला असता धरण्यातील पाणी पाहून त्यांनी पोहण्याचे ठरवले. पाण्यात उतरल्यावर त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात बुडू लागले. तिघांपैकी दोघांनी आपला जीव वाचवला आणि पाण्यातून बाहेर आले. मात्र अक्षय खोल पायात बुडू लागला त्याचा जीव वाचवायला मित्रांनी आरडाओरड केली. मात्र तिथे कोणीही नसल्यामुळे अक्षय पाण्यात बुडाला. 

घटनेची माहिती मिळतातच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सह शोधपथक घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू टीम ने घटनास्थळी जाऊन पाहणी केली अक्षयच्या मृतदेहाचा शोध सुरु झाला. सायंकाळी अक्षयचा मृतदेह सापडला. 

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी

Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हे जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय लगेच वापरून पहा

सर्व पहा

नवीन

Attack on Saif Ali Khan : पोलिसांनी करीनासह 30 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले

पुण्यात 20 वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या बांगलादेशीला अटक

LIVE: बोर्डाच्या परीक्षांनंतर बीएमसीच्या निवडणुका होतील!

20 तारखेपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, वर्ल्ड आयकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले कडक निर्देश ग्रामीण विकास कामांचे जिओ टॅगिंग अनिवार्य

पुढील लेख
Show comments