Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दत्ता फुगेंचा सोन्याचा शर्ट गायब

Webdunia
पुणे-  सव्वा कोटी रुपयांचा सोन्याचा शर्ट परिधान केल्यामुळे देशभर चर्चेत आलेल्या दत्ता फुगे यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी पाच जणांना तर शनिवारी आणखी चौघांना अटक केली. यापैकी सात जणांची खडकीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. सी. ढेंगळे यांनी 21 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत, तर दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ओळख परेड केल्यानंतर या दोघांना पुन्हा पोलिस कोठडीत पाठवण्याचा अधिकारही न्यायालयाने राखून ठेवला आहे. दरम्यान, ‘गोल्डमॅन’ फुगे यांच्या तब्बल साडेतीन किलो वजनाच्या शर्टचा मात्र ठावठिकाणा लागेनासा झाला आहे.
 
अतुल मोहिते व इतर आरोपींनी गुरुवारी मध्यरात्री फुगेंचा त्यांच्या मुलासमक्ष खून केला होता. याप्रकरणी तपास सुरू असताना पोलिसांनी फुगेंचा मुलगा शुभमकडे त्यांच्या सोनेरी शर्टविषयी चौकशी केली. त्यावर ‘सदर शर्ट आपल्या वडिलांनी चिंचवड येथील रांका ज्वेलर्सकडे सुरक्षित ठेवण्यास दिला होता, असे शुभमने सांगितले. तर आम्ही फक्त शर्ट तयार करून दिला, त्यानंतर तो आमच्याकडे देण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण रांका ज्वेलर्सच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे शर्ट नेमका गेला कुणीकडे, या प्रश्नाचे पोलिस उत्तर शोधत आहेत. राकां ज्वेलर्सकडून इन्कार आल्यानंतर आपण कुटुंबीयांशी बोलून माहिती घेतो, एवढेच उत्तर शुभमने माध्यमांशी बोलताना दिले. दरम्यान, सोन्याचा शर्ट बनवल्यानंतर फुगेंच्या पाठीमागे आर्थिक अडचणी सुरू झाल्या व त्यात त्यांनी सोन्याचा शर्ट विकला असावा, अशी शक्यताही स्थानिक नागरिक वर्तवत आहेत.

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींना पूर्ण हक्क, समान वाटा मिळाला पाहिजे - ईशा अंबानी

चिकनसोबत दारु पिण्यासाठी पैसे मागितले, न मिळाल्यास पत्नीची हत्या

नदी पात्रात बुडून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

RR vs PBKS : राजस्थान विरुद्ध पंजाब सामना कोण जिंकणार? प्लेइंग 11 जाणून घ्या

भारतात आला कोरोनाचा नवीन वेरिएंट, जाणून घ्या लक्षण

2019 मध्ये शपथविधीसाठी राहुल यांनी सूट शिवून घेतला होता - संजय निरुपम यांचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments