Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये ३ ऑक्टोबर रोजी भुजबळ समर्थकांचा विराट मूक मोर्चा

Webdunia
सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (10:54 IST)
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये दि.३ ऑक्टोबर रोजी भुजबळ समर्थकांकडून विराट मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज जयशंकर फेस्टिवल लॉन्स,औरंगाबाद रोड नाशिक येथे पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रासंगी सदर मूक मोर्चाचे नियोजन करण्यात आले. या बैठकीस सुमारे २ हजार भुजबळ समर्थक हजर होते.
 
माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्यावर शासनाने सुडबुध्दीतून ही कार्यवाही केलेली असल्याने त्यांच्या समर्थनार्थ ३ऑक्टोबर रोजी भुजबळ समर्थकांकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने पंचवटी लक्ष्मीनारायण मंदिर येथून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर पंचवटीतुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येईल व जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात येईल. 
 
छगनराव भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणारा मोर्चा कुठल्याही जाती, धर्मा विरुध्द नसून केवळ भुजबळ समर्थकांचा विराट मोर्चा राहणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले. हा मोर्चा कोणत्याही एका समाजाचा अथवा पक्षाचा नसून समस्त भुजबळ समर्थकांचा असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
 
बैठकीस माजी मंत्री तुकाराम दिघोळे, जयदत्त होळकर,मातंग समाजाचे नेते भरत जाधव, विश्वास कांबळे,बाराबलूतेदार संघाचे अरुण नेवासकर, माजी आमदार शेख रशीद यांचे समर्थक , राधकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सुर्यवंशी, अरुण नेवासकर, बाळासाहेब कर्डक, अंबादास खैरे, मधूकर जेजुरकर, पंढरीनाथ थोरे, बाजीराव तिडके, नगरसेविका सुनिता शिंदे, बालम पटेल, सुनिल सुर्यवंशी, अनिल महाजन, निवृत्ती भदाने आदीसह ओबीसी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

No shave November नो शेव्ह नोव्हेंबर म्हणजे काय, जो जगभरातील पुरुष साजरा करतात?

उद्या त्यांचा पक्ष फोडू शकतात, संजय राऊत यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सल्ला

गॅस सिलिंडरच्या दरात मोठी झेप, एका रात्रीत किंमती वाढल्या

महाराष्ट्र निवडणुकीसाठी काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची नियुक्ती केली

बंडखोरांवर भाजप कारवाई करणार का? अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने प्रश्न उपस्थित केला

पुढील लेख
Show comments