राज्य सरकारने व्यसनी शिक्षकांवर लक्ष केंद्रित केले आहे.राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.जर शाळेत कुणी व्यसनाधीन शिक्षक सापडला तर त्याला नोकरीत न ठेवता निलंबित करता येणार आहे.
गुरुजींनी जर शाळेत तंबाखू, विडी, सिगारेट किंवा दारू पिऊन आले किवा परिसरात आढळले तर त्यांच्यावर मोठी कारवाई करणार आहे. व्यसनी शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे. शासकीय परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे . शिक्षकांना तंबाखू, सिगारेट, खर्रा, दारु यांचं व्यसन असेल अशा शिक्षकांवर कारवाई करा असं या परिपत्रक सांगण्यात आल्ंाय. व्यसनी शिक्षकांवर कठोर कारवाई करत त्यांची बढती, शिक्षक पुरस्कार तसंच शासनाच्या मिळणार्या सोयींपासून वंचित रहाव लागणार आहे.