Marathi Biodata Maker

राष्ट्रध्वजाचा मान राखा

वेबदुनिया
26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्षोल्हासाने साजरा करी‍त असतो. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले तर काहींना घरदार सोडावे लागले आहे. एवढेच नाही तर आज बॉर्डरवर आपले सैनिक डोळ्यात तेल घालून अहोरात्र जागून देशाचे आपल्या शत्रूपासून संरक्षण करीत आहे. म्हणूनच तर आपण आपल्या आलिशान घरांमध्ये स्वस्थ आहोत. मात्र गेल्या काही वर्षापासून आपल्या देशाचे मानचिन्ह 'तिरंगा' झेंड्याची अवहेलना होत असल्याचे दिसत आहे.

भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीयाला दिले आहे. या दिवशी मोठ्या अभिमानाने सर्वजण ‘कागदी’ किंवा ‘प्लास्टिक’ चे राष्ट्रध्वज, बिल्ले, स्टीकर मिरवत असतात. मात्र हेच ध्वज दुसर्‍या दिवशी गचरा कुंडी, गटरीत फाटलेल्या अवस्थेत दिसतात. आणि आपली भारतीय स्वतंत्र जनते तेच ध्वज पायाने तुडवतात. मात्र ते उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावत नाहीत.

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करता येणार नाही, या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाला लाथाळून सर्रासपणे असे ध्वज तयार केले जात असून भारतीय जनता आपल्या मुलांना त्या ध्वजाचे महत्त्व न सांगता त्यांना खुशाल असे प्लास्टिकचे ध्वज खरेदी करून देत असतात. 

मुले तर मुलेच ना, त्यांना या ध्वजाचे महत्त्व माहित नसल्याने त्यांच्याकडून अशा चूक होणारच. परंतु पालकांनी सजगता दाखवून अशी प्लास्टिकचे ध्वज खरेदी करू नयेत. तरच त्याचे उत्पादनाला आपोआप खिळ बसेल.

क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांकडूनही आपल्या ध्वजाचा अवहेलना केली जाते. त्यांना तोंड व परिधान केलेल्या कपड्यावर तिरंगा रंगवून घेतांना काहीच कसे वाटत नाही. याचे आश्चर्य वाटते. आपण सांगा हे कितपत योग्य आहे. ध्वजाला कपड्यावर नाही तर मनावर स्थान पाहिजे. आणि ते आपल्या कर्तृत्त्वातून जाणवत असते.

शासनाने प्लास्टिकच्या ध्वज तयार करणारे उद्योग बंद पाडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. असा सूर स्वातंत्र्य सैनिकांमधून निघत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

इस्रोने अवकाशात इतिहास रचला, श्रीहरिकोटा येथून ब्लूबर्ड ब्लॉक-2 उपग्रह प्रक्षेपित केला, जाणून घ्या काय आहे खास?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का, राहुल कलाटे यांचा भाजपमध्ये प्रवेश

LIVE: महाराष्ट्रात मोठा बदल, अजित पवार आणि शरद पवार लवकरच एकत्र येणार

राष्ट्रवादीच्या गटांच्या विलीनीकरणाबाबत सुप्रिया सुळे यांची भूमिका स्पष्ट

पुण्यात महिला राष्ट्रीय कबड्डीच्या 13 वर्षीय खेळाडू वर 44 वेळा चाकूने वार करून हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

पुढील लेख
Show comments